• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर ठेवा नियंत्रण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विनापरवानगी फटाके विक्री केल्यास होणार कारवाई

ध्वनी, हवा प्रदुषण टाळण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) :- सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम आदेशानुसार दसरा, दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यास निर्बंध घालण्याबाबत अंतरिम आदेश दिलेले आहेत.

केंद्र शासन, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य शासन यांनी भारत सरकारच्या राजपत्रनुसार प्रकाशीत केलेल्या पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतूदींचे मुख्यत्वे करुन व नियमातील सुधारित नियम ८९ ची, जे फटाकच्या आवाजाच्या मानांकाबाबत आहेत त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मिटर अंतरापर्यंत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. जर साखळी फटाक्यात एकूण पन्नास, ते शंभर ते त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागे पासून ४ मिटर अंतरापर्यंत अनुक्रमे १५०, ११० व १०५ डेसीबल एवढी असावी व त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या तसेच १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.

फटाक्यांचे दारुकाम किंवा फटाके सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधी व्यतिरिक्त उडविण्यास परवानगी देण्यात येऊ नये. तसेच रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत दारुकाम व फटाके यांचा वापर करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांचे सभोवतालचे १०० मिटर पर्यंतचे क्षेत्र येते. राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण संस्थाच्या व्यवस्थापक व मुख्यध्यापक यांना ध्वनी व हवा प्रदुषणाने अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.

सर्वोच्च न्यायलयाने वरील आदेशाने ध्वनी / हवा प्रदुषणाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक वृत्तपत्रात, दुरदर्शन, आकाशवाणी व इतर प्रसिध्दी माध्यमांव्दारे प्रसिध्दी देण्यात यावी. सर्वोच न्यायालयाच्या वरील निर्देशांचे सर्व संबंधीतांना काटेकोरपणे पालन करावे वर उल्लेख केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके / साखळी फटाके जप्त करुन त्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशा शासनाच्या सुचना आहेत. सणांच्या कालावधीमध्ये अपघात घडणार नाही याची खबरदारी घेण्याची स्थानिक प्रशासन व त्यांचे अधिकारी यांना सुचना देण्यात येत आहे. आवश्यक त्या उपाययोजनेचे नियोजन देखील त्यांनी करुन ठेवण्याची दक्षता घ्यावी असे सुचित करण्यात येत आहे. दिवाळी हा आनंदपर्व साजरा करतांना योग्य ती दक्षता जनतेने घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

खानावळीत दारूचा साठा करून विक्री, मुद्देमालासह एकाला अटक

Next Post

कारमधून सव्वा लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, धुळ्याचा संशयित अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारमधून सव्वा लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, धुळ्याचा संशयित अटकेत

कारमधून सव्वा लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, धुळ्याचा संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon