एरंडोल शहरातील विद्या नगरातील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : येथे विद्या नगरातील डॉ. धीरज उर्फ राहुल मराठे हे घराला कुलूप लावून पारोळा येथे परिवारासह गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दोन्ही लाकडी व लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून आता प्रवेश केला व कपाटातील सुमारे ५० हजार रुपये रोकड व ३५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या लंपास करून पोबारा केला. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
एरंडोल येथील विद्यानगरामध्ये राहणारे डॉ. राहुल उर्फ धीरज मराठे हे पारोळा येथे परिवारासह रथोत्सव पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्या पश्चात अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराच्या लोखंडी व लाकडी अशा दोन्ही दरवाजांना लावलेले कुलूप तोडून आज प्रवेश केला . कपाट उघडून कपाटातील रोकड व ३५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या लंपास केल्या. बुधवारी सकाळी त्यांच्या घरासमोर राहत असलेले रमेश पाटील यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून डॉ. मराठे यांना याबाबत माहिती दिली.