एमआयडीसी पोलीस स्टेशनची शिरसोली येथे कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली गावामध्ये अज्ञात तरुण हे लाठयाकाठ्या आणि हत्यारे घेऊन गावांमध्ये दहशत माजवीत असल्याबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी त्यांनी धरपकड करीत तीन ते चार जणांना ताब्यात घेतले. रात्रभरपासून दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे.
शिरसोली येथे अशोक नगरामध्ये एका टोळक्याने तीन जणांना शस्त्राने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर गावांमध्ये ते शस्त्र घेऊन दहशत माजवीत असल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ त्यांचा कर्मचारी वर्ग आणि शिरसोलीतील कर्मचारी वर्ग सोबत घेऊन रात्रभर धरपकड केली. तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दंगा नियंत्रण पत्रकाला देखील बोलवण्यात आले. रात्रभरापासून शिरसोली गावात दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे.