यावल शहरातील घटना
यावल (प्रतिनिधी) :- शहरातील एका हॉटेलमध्ये ३३ वर्षीय तरुण त्याच्या मित्रासोबत जेवण करत होता. तिथे दोन जण आले आणि त्यांनी त्याला काही एक कारण नसतांना शिवीगाळ करून मारहाण केली. आणि त्यातील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरात हॉटेल निधी आहे. या हॉटेल निधी मध्ये नीरज सतीश चोपडे (वय ३३) हा तरुण त्याचा मित्र विक्की बाविस्करच्या सोबत शुक्रवारी रात्री जेवणाला गेला होता. त्या हॉटेलमध्ये श्याम अशोक ठाकरे व देवानंद बाळू कोळी (रा.शिवाजीनगर, यावल) हे आले. त्यांनी त्याला काही कारण नसतांना चोपडे यास शिवीगाळ करून मारहाण केली व त्यातील देवानंद कोळी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात नीरज चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी करीत आहे.