अमळनेरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे अनोखे आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे प्रतीकात्मक मुखवटे घालून त्यांची अमळनेर स्थानकावरून गुजरात येथे रवानगी करण्यात आली.
युवकांच्या पोटावर पाय देत सर्व प्रकल्प गुजरातच्या घशात ओतणाऱ्या आणि रोजगाराचा बळी घेणाऱ्या बोगस ट्रिपल इंजिन सरकारला कायमचे गुजरातला पाठवा, असे आवाहन युवक अध्यक्ष परेश शिंदे यांनी यावेळी केले. महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, फॉस्कोर्न, टाटा एअर बस आणि आता चाकण मधील ५० कंपन्यांनी गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला असताना महायुती सरकार गप्पा का? दावोस ला जाऊन महाराष्ट्रात मोठी इन्व्हेस्टमेंट आणतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तेथील होटेलचे बिल अजून चुकते केलेले नाही. यामुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी यावेळी केला.
आज सरकारचे गुजरात वरील प्रेम पाहता या तिघांनी बॅग भरून गुजरातला राहायला जावे . त्यासाठी त्यांची बॅग भरून तयार आहे तसेच त्यांच्या तिकिटांची देखील व्यवस्था आम्ही केली आहे असे शहर अध्यक्ष श्याम पाटील आंदोलन वेळी सांगितले. आंदोलन वेळी महिला तालुका अध्यक्ष कमल पाटील, ग्रंथालय नियोजन समिती सदस्य रिता बाविस्कर, युवक उपजिल्हाअध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील, अक्षय चव्हाण, शुभम पवार, आरती पाटील, रोशनी पाटील, योगेश शिसोदे, दिपक पाटील, वैभव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.