सावदा पोलीस स्टेशनची कारवाई
रावेर ( प्रतिनिधी ) : सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हतनूर धरणाजवळ सुमारे दोन लाखांचा गुटखा व सुगंधी तंबाखू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी अनिल ओंकार पाटील (वय ४०, रा. जळगाव), रोहित मुकेश बरकले (वय २२, रा. शिवपूर, ता. भुसावळ) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली. यानसुार त्यांनी सापळा रचून या आरोपींना लुमखेडा शिवारात हतनूर धरणाच्या पाटचारीजवळ पकडले. त्यांच्याकडून २ लाख ५६० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजीव चौधरी, सुनील कुरकुरे, बबन तडवी यांनी केली आहे.