जळगावातील पिंप्राळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला मंगळवार दि. २४ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दुकानात ठेवलेला ५० हजार रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा अंदांज व्यक्त करण्यात येत आहे.
किरण प्रभाकर कोळी यांचे पिंप्राळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर जवळ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान आहे. त्यांच्या दुकानाला सकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. याबाबत पुंडलिक कलाल यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. खबर मिळताच अग्निशमक विभागाचे जवान हे घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी आग आटोक्यात आणली.
या आगीत दुकानात असलेले तेलाचे पाऊच, डाळ व इतर साहित्य जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान पाटील, योगेश पाटील, इकबाल तडवी यांनी प्रयत्न केले. दरम्यान, यावेळी गल्लीतील नागरिकांनी देखील आग विझविण्यास मदत केली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक अंदांज व्यक्त करण्यात येत आहे.