नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज
यावल (प्रतिनिधी) : शहरात जुन्या भुसावळ नाक्याजवळ माजी नगराध्यक्ष शिर्के यांच्या घराजवळ बीएसएनएल कार्यालयासमोर मोकाट श्वानांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन जणांना चावा घेतला. यामुळे यावल शहरात कुत्र्यांची दहशत बसली आहे.
प्रशांत मनोहर बर्गे (वय ४२), माऊ मयूर कानडे (वय ६), राजू बळवंत देशमुख (वय ४८) या तीन जणांना त्या भागातील मोकाट श्वानांनी चावा घेतला. त्यांनी तात्काळ औषधोपचार घेतले. यावल नगरपालिकेचे याप्रकरणात दुर्लक्ष होत असले तरी नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.