रावेर तालुक्यातीलपाल रस्त्यावरील घटना
रावेर (प्रतिनिधी) : रावेर-पाल रस्त्यावर मोटर-सायकल टाटा मॅजिकचा मोठा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रावेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी गेले असून माहिती घेत आहेत.
आरसिंग पावरा (वय ३०, रा. झिरन्या जि. खरगोन) रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र आला होता. त्याच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. पाल- रावेर रस्त्यावर त्याची मोटरसायकल व टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला. यात आरसींग जागीच ठार झाला. त्याच्या मृत्युने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. रावेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली होती. अपघात प्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.