नशिराबादला दाखल गुन्ह्यात सावदा पोलिसांची कामगिरी


जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला सावदा पोलीस स्टेशनच्या पथकाने रावेर तालुक्यातील गाते या गावातून नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी नशिराबाद पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
मोहीत दिलीप कोळी (वय २५,रा. भादली ता. जळगांव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. हा संशयित मागील दिड महिन्यापासुन नशिराबाद पोलीसांना मिळत नव्हता. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना माहीती दिली. (केसीएन)सदरचा संशयित आरोपी हा सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेबाबत कळविल्याने सपोनि विशाल पाटील यांनी एक पथक तयार केले.
त्यात पोहेकाँ विजय पोहेकर, सिकंदर तडवी, सुनिल कुरकुरे, बबन तडवी, पोकाँ विनोद दामोदर यांना वर नमूद आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. सदर पोलीस पथकाने गोपनीय माहिती काढून संशयित मोहित कोळी याला गाते ता. रावेर येथे त्याचे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईकामी नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गणेश देशमुख व पथक यांचे ताब्यात दिले आहे.









