

चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचे आदेश
एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीतील ७९ जणांना चाळीसगाव परिमंडळ क्षेत्रातील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शहरबंदीचे आदेश काढले आहे. गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभुमीवर एरंडोल पोलीस प्रशासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविले. त्यावर यांनी निर्णय दिला.
गणेशोत्सव ईद ए मिलादच्या काळात एरंडोल शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे एरंडोल शहरातील उपद्रवी यांना शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना पाठविण्यात आले. या प्रस्तावावर कविता नेरकर यांनी निर्णय देत दि. १६ सप्टेंबर रात्री १२ वाजेपासून १८ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत शहरबंदीचे आदेश काढले. ७९ जणांना १८ सप्टेबर रात्री १२ वाजेपर्यत शहरबंदी, गावबंदी करण्यात आली.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्याकडून संबधितांना आदेश बजाविण्यात आले. जो कोणी एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत येईल किंवा या आदेशाचे पालन करणार नाही अश्या उपद्रवींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे डीवायएसपी सुनील नंदनवाळकर, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी सांगितले.









