एलसीबीची पाचोरा तालुक्यात कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातगाव डोंगरी आणि गाळण बु शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणी हातभट्टी उध्वस्त करीत पोलिसांनी दीड लाखांचा माल जप्त केला.
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवारात सुपडु तडवी व गाळण बु शिवारात अमोल जाधव हे बाभूळ जंगल भागात भट्टी लावून दारू गाळीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळवली. नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यात घटनास्थळी सातगाव डोंगरी ता.पाचोरा शिवारात सुपडु रहेमान तडवी यांच्याकडून ५४ हजार ४४० रुपये किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबत पथकाने गाळण बु ता.पाचोरा शिवारात अमोल राजेंद्र जाधव रा.पाचोरा यांचे कडून ८० हजार ७५० रुपये किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत नगरदेवळा औटपोस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.