• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अवयवदान व प्रत्यारोपण चिंतन शिबिरात डॉ नरेंद्र ठाकूर सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अवयवदान व प्रत्यारोपण चिंतन शिबिरात डॉ नरेंद्र ठाकूर सन्मानित

जळगाव (प्रतिनिधी ) ;– एरंडोल येथील माजी नगरसेवक , सुखकर्ता फाउंडेशन मार्फत अवयवदान क्षेत्रात कार्य करणारे भूलवैद्यकतज्ञ डॉ नरेंद्र ठाकूर हे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण केंद्रात दि .३० आणी ३१ ऑगस्ट रोजी आयोजित ह्या चिंतन शिबिरात निमंत्रित होते .यावेळी त्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

देशातील अवयवदान चळवळीस लोकअभियानाचे स्वरूप येण्यासाठी , अवयव दान – प्रत्यारोपण प्रक्रियेत सुलभता , एकसंघपणा यावा , वेगवेगळ्या राज्यात असलेल्या विभिन्न प्रणालीमुळे येणाऱ्या समस्या सोडविणेकामी एक राष्ट्र – एक धोरणाची दिशा निश्चिती करणेसाठी ह्या क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था ह्यांना सोबत घेऊन एक व्यापक अभियान राबविण्यासाठी हे चिंतन शिबीर अवयवदान – प्रत्यारोपण प्रक्रियेतील भारतातील सर्वोच्च शासकीय संस्था ” National Organ and tissue transplant organisation” NOTTO “अर्थात राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्था व केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब मंत्रालय ,आरोग्य महासंचालक कार्यालय ,नवी दिल्ली ह्यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले होते .

ह्या शिबिरात झालेल्या मंथनातून , चर्चेतून आगामी काळात अवयवदान प्रत्यारोपण मोहिमेत प्रभावी असे बदल घडून येण्याची अपेक्षा आहे .
ह्या चिंतन शिबिरात केंद्रीय आरोग्य मंत्रालय दिल्ली येथील समुचित अधिकारी , प्रत्येक राज्यातील विभागीय प्रत्यारोपण समिती ह्यांचे अधिकारी , कायदा व न्याय क्षेत्रातील नामांकित अभ्यासक , ट्रान्सप्लांट करणारे शल्यचिकित्सक , भारतीय विमा न्याय प्राधिकरण ह्यांचे प्रतिनिधी ह्यांचा हि समावेश होता .
सम्पूर्ण देशातील अवयवदान जनजागृती क्षेत्रात कार्य करणाऱ्या मोजक्या व निवडक संस्थाच्या प्रतिनिधीना ह्या चिंतन शिबिरात निमंत्रित केले गेले होते .
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सुखकर्ता फाउंडेशन चे प्रतिनिधी म्हणून डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांना प्राप्त झाली .

ह्या चिंतन शिबिरात केंद्रीय आरोग्य तथा कुटूंब मंत्रालय नवी दिल्ली चे मुख्य सचिव श्री . अपूर्व चंद्रा , आरोग्य संचालनालय चे मुख्य संचालक डॉ . प्रो . अतुल गोयल , नोटो चे संचालक डॉ अनिलकुमार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
१६ आणि १७ ऑगस्ट रोजी जयपूर येथे आयोजित राष्ट्रीय अवयव व देहदान परिषदेसाठी हि डॉ नरेंद्र ठाकूर हे निमंत्रित होते . ह्या दोन दिवसीय परिषदेसाठी भारतातील मोजक्या संस्था ह्या निमंत्रित होत्या . जयपूर येथील जैन सोशल ग्रुप सेंट्रल संस्थान व नवी दिल्ली येथील दधिची देहदान समिती तर्फे हि भव्य परिषद आयोजित करण्यात आली होती .

राजस्थान सरकार च्या उपमुख्यमंत्री श्रीमती . दियाकुमारी , विधानसभा अध्यक्ष वासुदेव भगनानी , केंद्रीय रस्ते तथा परिवहन राज्यमंत्री श्री हर्षजी मल्होत्रा , दिल्ली विधानसभाचे माजी अध्यक्ष श्री आलोकजी ह्यांची ह्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती . जयपूर येथील बिर्ला ऑडिटोरियमच्या भव्य अश्या सभागृहात मृत्युंनतर देहदान करणाऱ्या महनीय दात्यांच्या वारसदारांच्या सन्मानाच्या सोहळ्याप्रसंगी भारताचे उपराष्ट्र्पती महामहिम श्री जगदीपजी धनखड ह्यांची विशेष उपस्थिती होती .

ह्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेतून काही निवडक मुद्दे जे आगामी काळातील अवयव व देहदान प्रक्रियेसाठी दिशादर्शक ठरतील , त्यांचा समावेश नवी दिल्ली येथील आरोग्य मंत्रालयतर्फे आयोजित चिंतन शिबिरात करून सम्पूर्ण देशातील अवयवदान – प्रत्यारोपण प्रकियेत व देहदान प्रक्रियेस एकसंघ व प्रमाणित करणेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे .

डॉ नरेंद्र ठाकूर हे सुखकर्ता फाउंडेशन ह्या त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत गेल्या १२ वर्षांपासून अवयवदान व देहदान जनजागृती कार्यात धडपड करत आहे . जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवस्थापित देहदान विषयक समितीवर अशासकीय सदस्य म्हणून हि त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे .
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव ह्या सेवाभावी संस्थेच्या ऑर्गन अँड बॉडी डोनेशन कमिटी चे चेअरमन म्हणून डॉ . नरेंद्र ठाकूर अवयवदान व देहदान क्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे कार्य करत आहे .


 

Tags: #jalgaon
Previous Post

अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, दंडाची दिली नोटीस

Next Post

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon