• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2024
in क्राईम, जळगाव
0
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगावातील अवसायकासह वसुली अधिकार्‍याला दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुख्य कार्यालयातच मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही धडक कारवाई केली आहे.

चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, मूळ रा. गांधीनगर, नागपूर) असे अटकेतील अवसायकाचे तर सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. गुजराल पेट्रोल पंप जवळ, जळगाव) असे वसुली अधिकार्‍याचे नाव आहे. ४३ वर्षीय तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधून कर्ज घेतले होते.(केसीएन)त्यांनी या कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले असून त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या कर्ज रक्कमेची एक रक्कमी (वन टाईम सेटलमेंट) किती रक्कम भरावी लागेल ? याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे जळगवातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेले होते.

वसुली अधिकारी सुनील पाटील यांनी तक्रारदार यांच्या आई व व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या किंवा वसूल करावयाच्या मुद्दल कर्ज रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची अवसायक चैतन्य नासरे यांच्याकडून परवानगी देण्याच्या मोबदल्यात दोघांसाठी दिड लाख रुपयांची लाच १४ ऑगस्ट २०२४ रोजी मागितली होती व लाच रक्कमेत तडजोड होणार नसल्याचेही तक्रारदाराला बजावल्यानंतर त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी अवसायक चैतन्य नासरे यांनी लाच रक्कम संशयित आरोपी सुनील पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराने रक्कम दिली व लागलीच एसीबीने दोघांना अटक केली. (केसीएन)जळगाव एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, स्वप्नील राजपूत (वाचक पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


 

 

Previous Post

३० लाख रुपयांचा मामला : परिचारिकेचा कारमध्ये दाबला गळा, शिरपूर तालुक्यात तापी नदीपात्रामध्ये फेकला मृतदेह

Next Post

शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon