पाळधी येथे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव (प्रतिनिधी) : संत सेना महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्तिरसाची उपासना केली. सेना महाराजांचे विचार आणि शिकवण आजही आपल्याला दिशादर्शक असून त्यांच्या विचार व शिकवणीतून आपल्याला जीवनात शांती, समाधान आणि आनंद मिळण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ते पाळधीत आयोजित आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा.जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार होते. सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री सत्यनारायण पूजन व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक गोपाल सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश फुलपगार यांनी तर आभार संदीप फुलपगार यांनी मानले.
यावेळी पाळधी बु. लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच पती शरद कोळी, उद्योजक दिलीप पाटील, चांदसरचे माजी सरपंच सचिन पवार, अ.भा.जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार, सेवानिवृत्त पी.एस.आय. नारायण सोनवणे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र बोरनारे, कुमार श्रीरामे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाळधी येथील सलून दुकानदार संघटना व अखिल भारतीय जिवा सेना पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले.