जळगाव,: – महाराष्ट्रातील कुशल बेरोजगार युवक युक्तीना इस्राईल येथे रोजगारासाठी महाराष्ट्र शासनाची योजना स्वप्नांची क्षितिजे विस्तारणार युवकाना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फेनवर्क / शटरिंग कारपेंटिग, लोखंड वाकवणे/बार बेन्डींग (शटरिंग काम), पॉलिश फरशी काम (सिरेमिक टाइल्स), गिलावा काम (प्लास्टरिंग काम)
नर्सिंग पॅरामेडिकल क्षेत्रात खालील कौशल्य असलेल्यांना रोजगाराची संधी
वृध्दाची / आजारी व्यक्तींची काळजी देखभाल घेणे, इंजेक्शन, ड्रेसिंग इ. वैद्यकीय कामाचे कौशल्य इ, तात्काळ उपचार करण्याबाबतची माहिती
इच्छूक उमेदवारांसाठी पात्रता
इस्राईल मध्ये काम करण्याची इच्छा, उमेदवाराला जुजबी इग्रजी विषयाचे ज्ञान, क्षेत्रासंबधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र, किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट, किमान शिक्षण अट नाही, वयोमर्यादा प्रदीर्घ २५-४५ वर्षे, कोणताही प्रदीर्घ आजार नसावा.
इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी सपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येईल. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास अंदाजित रु.१ लाख ३७ पर्यंत मासिक वेतनाची संधी व आतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी, कॉन्ट्रेक्ट कालावधी किमान ३ वर्ष, पुढील टप्यात यासह इत्तर क्षेत्रातील एक लाख कौशल्यधारकांना व युवतींना केअरगिबिग (Caregiving), नर्सिंग पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी, इच्छुक उमेदवारानी अधिक माहितीसाठी हेल्प लाईन १८००१२०८०४० येथे तात्काळ संपर्क साधावा, बांधकाम क्षेत्रातील इच्छूकांनी पुढील लिंकवर नोदणी करावी :https://t.Jy/FMYyR असे कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी दुसाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.