नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- हजारो निष्पाप नागरिक ठार झालेल्या इस्त्रायल आणि हमास यांच्यात तीन दिवसांसाठी युद्ध थांबले असून
गेल्या अनेक दिवसांपासून या युद्धाला थांबविण्याचे प्रयत्न अनेक देशांनी केले . मात्र अवघ्या १० महिन्याच्या चिमुकल्याने युद्ध थांबविल्याचा
प्रकार समोर आला आहे.
https://twitter.com/i/status/1829225580492927396
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हमास आणि इस्रायलने वेगवेगळ्या झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह अनेक महासत्ता प्रयत्न करत होते, पण एका 10 महिन्यांच्या बाळाने हा चमत्कार केला आहे. युद्ध थांबवण्याचे कारण म्हणजे, डब्ल्यूएचओला गाझामध्ये 25 वर्षांनंतर पोलिओचा विषाणू आढळला आहे. 10 महिन्यांच्या अब्दुल रहमान टाइप 2 पोलिओ विषाणूची लागण झाल्याने अपंग झाला आहे. ही माहिती समजताच डब्ल्यूएचओने गाझामध्ये पोलिओची लस देण्याची मोहिम हाती घेतली आहे. या भागातील 6.4 लाख मुलांना तत्काळ पोलिओ लसीकरणाची आवश्यकता असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणने आहे.
डब्ल्यूएचओचे अधिकारी रिक पेपरकॉर्न यांनी सांगितले की, युद्धामुळे या भागात पोलिओ लसीकरणाची मोहिम राबवणे अवघड झाल्यामुळे त्यांनी युद्धविरामची विनंती केली होती. त्यामुळेच आता इस्रायली लष्कर आणि हमासमध्ये 3 वेगवेगळ्या झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धविरामावर सहमती झाली आहे. या 3 दिवसांच्या युद्धविराम काळात 6 लाख 40 हजार मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणारी लसीकरण मोहिम सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. लसीकरण मोहीम मध्य गाझा येथून सुरू होईल,