लोंढवे गावातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोंढवे गावात चोरट्यानी धुमाकूळ घालत एकाच रात्री आठ घरफोड्या केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये घरातील मौल्यवान वस्तू, सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरी झाली आहे. यामुळे गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दिनकर पाटील यांचे घरातून पाच ग्रामची रिंग जोगव्यांचे जोड व एक ग्राम सोन्याची चीप गेली व १५०० रू ची रोकड चोरी गेली आहे. तर रमेश पाटील, पुष्पा पाटील, चुडामन पाटील, श्रीराम पाटील, हिम्मत पाटील, आबा पाटील हे उद्योग धंद्यासाठी बाहेरगावी आहेत. त्यांचे घरातील माहिती बाहेर आली नाही. यापैकी अनिल पाटील यांचे दरवाजा तोडून कपाट उघडून सामान अस्ताव्यस्त आढळून आला आहे.
तर दिनकर नामदेव बहिरम यांचे ६ ग्रॅम सोने व चांदी, चुडामण राजाराम पाटील यांचेही ७ ग्रॅम सोने ३००० रोख, पुष्पाबाई अनिल बहिरम, श्रीराम वामन बहिरम, अनिल गोबा पाटील यांचे १ लाखाचे सोने वाचले आहे. हिम्मतराव शिपाई, राकेश गुलाब पाटील, रमेश देवचंद पाटील यांचे ७२ हजार १० ग्रॅम सोने चोरीतून वाचले आहे. अद्याप कुठल्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही.