चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडगाव येथील भर रस्त्यावर असलेले रसवंतीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह आतील साहित्य असा ४० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
किशोर पाटील यांच्या मालकीचे हे दुकान आहे.चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील साई रसवंती आणि वेफर्स या दुकानातील रसवंतीचे मशीन, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, वेफर्स तळण्यासाठी चार डबे तेलाचे व कॅरीबॅग तसेच किरकोळ रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
गावातील उत्तरकार्यासाठी काही नातेवाईक आले होते. त्यापैकी काहींनी शेताकडे फेरफटका मारून येऊ, म्हणून दुकानाकडे गेले असता या दुकानाचे कुलूप गायब व दुकान उघडे दिसले. दुकान मालक किशोर पाटील यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. दुकानात पाहिले असता चोरट्यांनी या वस्तू गायब केल्याचे लक्षात आले. किशोर हे पत्नीसह केळीचे वेफर्स बनवून त्याच्यातून दोन पैसे कमवून संसाराचा रहाटगाडा चालवत होता. संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.