जळगाव शहरातील प्रेमचंद नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जळगाव-भुसावळ हायवे नजीक प्रेमचंदनगर भागातील सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफीसमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. दुकानाचे मालक कृष्णकुमार विभूती यांना धक्का देऊन डोळ्यात मिरचीची पावडर फेकली. त्यानंतर ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख रक्कम व ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकुण १ लाख १३ हजार ०१५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.घटना शुक्रवारी दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली आहे.
शहातील जळगाव-भुसावळ हायवे नजीक प्रेमचंदनगर भागातील चेतन पाटील यांचे मालकीचे दुमजली अपार्टमेंट आहे. याठिकाणी तळमजल्याची रुममध्ये कृष्णकुमार विभूती सिंग याच्या मालकीचे सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफीस आहे. ते हजर असतांना एका अनोळखी इसमाने ऑफीसचा बंद दरवाजा वाजविला. दरवाजा उघडला असता अज्ञात आरोपी याने कृष्णकुमार विभूती सिंग याच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून रुममध्ये येवून त्यांना धक्का दिला. ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण १ लाख १३ हजार ०१५ किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरि. प्रिया दातीर यांच्या दिला आहे.