जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील सावदा पोलिसांनी मोटारसायकल चोरट्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रोझोदा येथुन दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री कमलाकर एकनाथ पाटील (वय ५४ वर्षे रा. रोझोदा ता. रावेर) यांच्या मालकीची ४५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली म्हणुन सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. मोटारसायकल चोरीबाबत कोणतीही गोपनीय माहिती नसतांना सावदा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोपनिय माहिती घेऊन चोरीला गेलेली मोटारसायकल व संशयित आरोपी याचा शोध घेतला.
संशयित आरोपी दिनेश लखन बारेला (वय ३६ वर्षे, रा. खयडी बरडी पिंप्रीजवळ ता. भिकणगाव जि. खरगोन, मध्यप्रदेश) यास शिताफीने पकडून मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशिर तडवी,पोलिस नाईक निलेश बाविस्कर,पोलिस हेड कॉन्स्टेबल संजिव चौधरी,पोलिस हेड कॉन्स्टेबल मझहर पठाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद तडवी यांनी हि उत्कृष्ट कामगिरी केली आहे.