जळगाव – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे रॅगिंग विरोधी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दि १७ ऑगस्ट रोजी समारोप करण्यात आला.
या चर्चासत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगावच्या प्राचार्या डॉ. नयना झोपे, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा गणविर उपस्थित होत्या. त्यांनी रॅगिंग हा फौजदारी गुन्हा कसा आहे, यावर सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या सत्रासाठी बीएस्सी तिस—या सेमीस्टरचे एकूण ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हे सत्र सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरले. यावेळी प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. स्वाती गाडगोणे, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी आदि उपस्थित होते. दि.१३ रोजी क्टिव्हिटी स्किट परफॉमनेस ऑफ आदर द न्यू रिजेक्ट ऑफ द रॅगिंग,दि १४ रोजी रॅली, स्लोगन, रिल मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. दि १६ रोजी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर १७ रोजी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा गणविर, मेडीकल सर्जीकल विभाग प्रमुख प्रा मनोरमा कश्यप,विदयार्थी कल्याण विभागाच्या समन्वयक प्रा रश्मी टेभुर्णे यांच्या उपस्थीतीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचा अँन्टी रॅगींग संदर्भातील चित्रफित दाखवण्यात आली व बक्षीस वितरणाने सप्ताहाचा समारोप करण्यात आला. प्रा. रश्मी टेंभुर्णे, प्रा. स्वाती गाडेगोणे,प्रा पायल हांडे प्रा.सुवर्णा पाटील टयुटर रितेश पी यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परीश्रम घेतले.