एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे उपक्रम
एरंडोल (प्रतिनिधी) : रिंगणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के खर्च निधी अंतर्गत गावातील ३० दिव्यांगांना सरपंच भानुदास मते यांच्या हस्ते सिलिंग फॅन वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सुमनबाई शेळके, नकुल सपकाळे, अरुण डोके, समाधान महाजन, साहेबराव महाजन, फकिरा पटेल, दयाराम महाजन, मेघराज महाजन, दत्तात्रय महाजन, रवींद्र पाटील, नामदेव माळी, रमेश भोई, प्रकाश तांदळे, रामदास पाटील, साहेबराव महाजन, शशिकांत पवार, बाबुलाल भालेराव, रमेश घुले, फकिरा पटेल, मीराबाई पाटील, जयश्री पाटील, पंडित डोके, मेघराज महाजन, भैय्यासाहेब पाटील, पद्माकर महाजन उपस्थित होते.