जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात राहणाऱ्या एका वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सोन्याची चांदीचे दागिने असा एकूण ५३ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश जयराम गोयल (वय-६० रा. गणपती नगर, कुसुंबा ता. जळगाव) हे वृद्ध व्यक्ती परिवारासह वास्तव्याला आहेत. दि. २ ते ८ ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून ५३ हजार ३०० रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता समोर आले. या संदर्भात सुरेश गोयल यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.