मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रस्त्यालगत घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शहरातील भुसावळ रोड लगत असलेल्या दगडी खदानीत पडून एका ४९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर गोपाळ मराठे (वय ४९ वर्षे) असे मयत इसमाचे नाव आहे. पत्नी, दोन मुलं व एक मुलगी यांच्यासह तो मुक्ताईनगर शहरात राहत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मराठे यांच्या पत्नीने एकविरा फायनान्स चे कर्ज घेतले होते. सदर कर्ज फेडण्याची चिंता नेहमी किशोर मराठे यांना असायची. याच चिंतेमध्ये व विचारात असताना किशोर गोपाळ मराठे हे भुसावळ रोड लगत असलेल्या दगडी खदानीत पडले व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे खबरमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या संदर्भात खबर देणार लहान भाऊ श्याम मराठे यांना सकाळी ९ वाजता भ्रमणध्वनी द्वारा समजले तेव्हा ते सदर खदानीत गेले असता त्या ठिकाणी लोकांची गर्दी होती व त्यांच्या भावाच्या चपला त्या ठिकाणी पडलेल्या होत्या.
दरम्यान किशोर मराठे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला होता. मयत किशोर यांचा लहान भाऊ श्याम गोपाळ मराठे (वय ४२ वर्षे, रा. श्रीराम नगर, भिलवाडी मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.
मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.