जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली येथील सौ हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली येथे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बाल विकास विभाग जळगाव युनिसेफ व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रकल्प हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणून तर मुख्याध्यापिका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्या अनुषंगाने विद्यार्थी सक्षमीकरण सत्र देवयानी विठ्ठल पाटील यांनी तर पालक जागरूकता सत्र सौ.वंदना मनोज पवार यांनी कृतीयुक्त सादरीकरण करून बालविवाह नियोजनाची गरज आपल्या कृतीयुक्त प्रबोधनातून विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांना पटवून दिले.
आजही बालविवाह समाजातील खूप मोठी समस्या असून एकीकडे मुली शिकण्याचे सुशिक्षित होण्याचे प्रमाण वाढत आहे मात्र दुसरीकडे बालवाडी मुला मुलींचे लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढत आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर पालकांनी जागृत होऊन मुलीचे वय 18 वर्षे वय 21 वर्षे होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्धार करावा एवढेच नाही तर अशा घटना घडत असल्यास त्यांची माहिती तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन करण्यात आले.
कृतीयुक्त प्राधिकरण करून बालविवाह नियोजनाची गरज आपल्या कृतीयुक्त प्रबोधनातून विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांना पटवून दिले आजही बालविवाह समाजातील खूप मोठी समस्या असून एकीकडे मुली शिकण्याचे सुशिक्षित होण्याचे प्रमाण वाढत आहे मात्र दुसरीकडे बालवाडी मुला मुलींचे लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढत आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर पालकांनी जागृत होऊन मुलीचे वय 18 वर्षे वय 21 वर्षे होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्धार करावा एवढेच नाही तर अशा घटना घडत असल्यास त्यांची माहिती तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवावी असे सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील शिक्षक व शिक्षके कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका योगिता शिरीष बडगुजर यांनी केले तर आभार कामिनी संजय पाटील यांनी मांडले.