जळगावातील शिवाजीनगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : घरासमोरील गटारीत कचरा टाकण्याच्या कारणावरून एका महिलेच्या पायावर फरशी टाकून दुखापत केल्याची घटना दि. १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी दि. २३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला येथील बाबुराव रामाचंद्र भापकर (वय ६६) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी ही जळगाव शहरातील शिवाजी नगरात वास्तव्याला आहे. दि. १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता त्यांची मुलगी व त्यांच्या घराच्या शेजारी राहणारी महिला मोना राजेश बादल यांच्यात गटारीत कचरा टाकण्यावरून वाद झाला. या वादातून मोना बादल या महिलेने मुलीच्या पायावर फरशी टाकून दुखापत केली.
याप्रकरणी अखेर मंगळवारी २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मोना राजेश बादल रा. शिवाजी नगर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहे.