• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवा करून विश्वास संपादित करा : पालकमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवा करून विश्वास संपादित करा : पालकमंत्री

महाभरतीअंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. आयुष्यात संघर्ष हा महत्त्वाचा आहे आणि संघर्षातूनच आपण बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो. यामुळे या पुढल्या काळात शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवा करून विश्वास संपादित करा, जनतेची मने जिंका. गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

महाबळ परिसरातील संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवार दि.२५ जुलै रोजी शासनातर्फे राबविण्यात आलेल्या महाभरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप व जळगाव पर्यटन चित्रफितीच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ना. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ.सुरेश भोळे, आ. लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.डी लोखंडे, प्रशिक्षणातील सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केजो यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी महसूल व जिल्हा परिषद प्रशासनातील महाभरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या एकूण ४१४ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नवनियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यात तलाठी १९५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३५, स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक ३२, औषध निर्माण अधिकारी १०, कनिष्ठ सहाय्यक ३५, व शिक्षण सेवक ११४ यांचा समावेश आहे. आपण एकदा संघर्ष करून परीक्षा दिली की उत्तीर्ण होतात व शासकीय नोकरीत समाविष्ट होतात. मात्र आम्हा राजकारण्यांचे आयुष्यात दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे आम्हालाही आयुष्यात संघर्ष करावा लागतो. भावी आयुष्यात प्रगती करायची असेल तर आत्ताच मेहनत घ्यावी लागेल तेव्हाच आम्हाला आपल्यात बसलेल्यातून एखादा वरिष्ठ अधिकारी झाल्याचे बघायला मिळेल, अशी खात्री देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, महसूल प्रशासनाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांचे यावेळी जाहीर अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यातील २१ पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या चित्रफितीचें लोकार्पण करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत भूषणावह असून पर्यटनावर आधारित चित्रफित तयार करणारा जळगाव जिल्हा हा पहिलाच जिल्हा असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मानले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी सोपान कासार हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaonayush prasadgulabrao patil
Previous Post

पाचोरा-भडगाव रोटरी क्लबचा उद्या पदग्रहण समारंभ

Next Post

गटारीत कचरा टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

गटारीत कचरा टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon