उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील घटना
गोंडा (वृत्तसंस्था ) ;- यूपीतील गोंडा जिल्ह्यात आज एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास डिब्रूगढ़ एक्सप्रेस (15904)चे सुमारे 12 डब्बे रुळावरून घसरून चार प्रवाशांचा मृत्यू झाला . दरम्यान 27 प्रवाशी जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही एक्सप्रेस चंदीगडवरून डिब्रुगढला जात होती.
झिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकाच्या तीन किलोमीटरच्या अपघात झाला . अफघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले . त्यांच्याकडून बचावकार्य सुरू होते.
चंदीगडहून ही ट्रेन निघाली होती. गोंडापासून 20 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. दोन बोगी रुळावरून उतरल्या. त्यामुळे रुळ उखडली गेली. हा अपघात झाल्याने अनेकजण भयभीत झाले. गाडीतील सामान भराभरा अंगावर पडल्याने कुणाच्या डोक्याल, कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला जबर मार लागला. काहींच्या बॅगा हरवल्या तर काहींच्या सुटकेस मिळेनाशा झाल्या. अपघात होताच प्रवाशांनी एकच आक्रोश केला.या अपघातात 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची माहिती घेतली असून तात्काळ रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे पूर्ववत सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आसाम सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार एकमेकांच्या संपर्कात असून प्रवाशांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.