नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच महाआघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

🇮🇳Ramraje Shinde🇮🇳
@ramraje_shinde
ब्रेकींग: कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ असून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो. उद्धव यांनी आत्ताच महाआघाडी तोडावी. अन्यथा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील. Article 356 नुसार राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात. @Swamy39
View image on TwitterView image on Twitter
36
12:18 PM – May 20, 2020
Twitter Ads info and privacy
19 people are talking about this
महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले.







