• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंतरराज्य गुरे चोरीची टोळी निंभोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पकडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
आंतरराज्य गुरे चोरीची टोळी निंभोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पकडली

११ म्हशी, कार-दुचाकीसह १६ लाखांचा मुददेमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : गुरे चोरणा-या आंतरराज्य टोळीस निंभोरा पोलिसांच्या पथकाने अटक केली असून ११ म्हशींसह एकुण १६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. निंभोरा पोलिस स्टेशनला गुरे चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल होते. या दोन्ही गुन्ह्याच्या तपासाअंती अटकेतील टोळीकडून एकुण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ज्ञानेश्वर चौधरी, पो.ना.अविनाश पाटील हे पोलीस स्टेशनला दाखल म्हशी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासादरम्यान ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी करण्यात आली होती. तपासादरम्यान गुरे चोरणारे संशयित आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी तुकाराम रुमालसिंह बारेला (रा. बोरी जि. ब-हाणपूर) हा यावल तालुक्यातील फैजपुर, न्हावी परिसरात असल्याची पोलिस पथकाची खात्री झाली. फैजपूर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी करण्यात आली.

संशयित तुकाराम बारेला याची सखोल चौकशी केली असता गुरे चोरीतील इतर आरोपी मध्य प्रदेशात असल्याची माहिती समोर आली. त्या माहितीच्या आधारे स.पो.नि. हरिदास बोचरे यांच्या पथकातील पोहेकॉ. जाकीर पिंजारी, चालक हेकॉ. योगेश चौधरी, पो.ना. सुरेश पवार व पो.कॉ. मयुर निकम व रावेर पो. स्टे. चे पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण, पो.कॉ. सचिन घुगे आदींचे शोध पथक मध्यप्रदेशात गेले.

तेथून धर्मेंद्र दुरसिंग बारेला (रा. ढेरीया जि. खंडवा) आणि शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा जि. ब-हाणपूर), सुभाष प्रताप निंगवाल (रा. दहिनाला जि. ब-हाणपूर), मस्तरीराम काशीराम बारेला (रा. न्हावी ता.यावल) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ११ म्हशी व गुन्ह्यात वापरलेल्या दोन बोलेरो पिकअप व दोन मोटार सायकल असा एकुण १६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

त्यांनी गुन्हा कबुल करत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध पोलिस स्टेशनला दाखल दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात निंभोरा पोलिस स्टेशनसह फैजपुर, सुरत, मुक्ताईनगर, रावेर, सिल्लोड ग्रामीण जि. छत्रपती संभाजीनगर व पंधाना पो.स्टे. (जि, खंडवा मध्यप्रदेश) आदींचा समावेश आहे.
अटकेतील आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला याच्याविरुद्ध विविध कलमाखाली मध्य प्रदेशातील पोलिस स्टेशनला दाखल असून तो खंडवा जिल्ह्यातील पंधाना पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील हिस्ट्रीसिटर आहे. त्याला मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपूर, खंडवा, खरगोन व हरदा या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

निभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे यांच्यासह श्रेणी पोलिस उप निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, चालक सहायक फौजदार अशरफ शेख, पो.कॉ. स्वप्निल पाटील, पोना सुरेश अढायगे, पोना सुरेश पवार, पोकॉ. मयुर निकम, पो.कॉ. किरण जाधव, पो.कॉ. अमोल वाघ, फैजपूर पोलिस स्टेशन प्रभारी अधिका-यांसह सहायक फौजदार विजय चौधरी, स.फौ. देविदास सुरदास, पोहेकॉ. राजेश ब-हाटे, पोहेकॉ महेद्र महाजन, रावेर पो स्टे चे पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, पो.कॉ. सचिन घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. ईश्वर पाटील, पो.कॉ. मिलींद जाधव, पो.कॉ. गौरव पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चाळीसगाव शहरातील घरफोडी प्रकरणी बुलढाण्यातील एकास अटक

Next Post

चोरीस गेलेले नांगरटीचे ट्रिलर मशीन अवघ्या तीनच दिवसात शोधले : संशयितास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

चोरीस गेलेले नांगरटीचे ट्रिलर मशीन अवघ्या तीनच दिवसात शोधले : संशयितास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon