• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

चोपड्याच्या तरुणाने केली धारदार शस्त्राने युवतीची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चोपड्याच्या तरुणाने केली धारदार शस्त्राने युवतीची हत्या

बाबा आमटेंच्या चंद्रपुरातील आनंदवनात खुनाचा थरार

चंद्रपूर (वृत्तसेवा) : समाजसेवक बाबा आमटे स्थापित गजबजलेल्या वरोरा आनंदवनातील वसाहतीत दिव्यांग आई- वडिलांसोबत राहणाऱ्या एका युवतीची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना दि. २६ जूनच्या रात्री ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून तातडीने तपास सुरू झाला आहे.

आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २४) असे मृत युवतीचे नाव आहे. आनंदवनातील संधीनिकेतन शाळेजवळील वसाहतीत दिगंबर चंद्रवंशी हे पत्नी व मुलगी आरतीसह बऱ्याच वर्षांपासून वास्तव्याला आहेत. दिगंबर व त्यांची पत्नी दिव्यांग आहे. दि. २६ जूनला सकाळी आरतीचे आई-वडील काही कामानिमित्त सेवाग्राम येथे गेले. त्यावेळी आरती घरी एकटीच होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडील दिगंबर यांनी आरतीला अनेकदा फोन केला. मात्र, तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. सेवाग्राम येथील काम आटोपून रात्री ९ वाजता दोघेही पती-पत्नी आनंदवन वसाहतीमधील आपल्या खोलीत आले.

दरवाजा उघडून आत गेले असता मुलगी आरती ही स्नानगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता धारदार शस्त्राने वार करून आरतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आनंदवनात दिवसभर रेलचेल असताना भरदिवसा युवतीची हत्या होणे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आनंदवनातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून तातडीने तपास सुरू केला.

घटनास्थळावर श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. संशयित आरोपीने शस्त्र आणि आरतीचा मोबाइल सुद्धा सोबत नेला. या प्रकरणाबाबत पोलिसांनी अतिशय गोपनीयता पाळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दि. २७ जूनला सकाळच्या सुमारास समाधान माळी (रा. चोपडा, जि. जळगाव, हल्ली मु. वरोरा) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी, असा अंदाज परिसरात वर्तविण्यात येत आहे.

 

 


Tags: #chopda#crimechandrapurmurder
Previous Post

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत कोसळल्याने एक ठार

Next Post

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर राजसिंग छाबरा याची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर राजसिंग छाबरा याची निवड

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर राजसिंग छाबरा याची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon