जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा गावात असलेल्या ग्रामपंचायती जवळ एकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून खिशातील ३ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवार १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. या प्रकरणी जळगाव एलसीबीने ३ जणांना अटक केली आहे.
वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) (तिघे रा. असोदा ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, भोळे नगर, असोदा) यांनी फिर्याद दिली होती. शुक्रवार दिनांक १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ते असोदा ग्रामपंचायत जवळ बसले होते. तेव्हा गावातील वैभव विजय सपकाळे (कोळी) हा मोटार सायकलवर वाल्मीक यांच्याजवळ आला.
त्याचेजवळ मोटार सायकलवर गावातील कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) असे मागे बसलेले होते. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीकलां १ हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा वाल्मीक यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.
याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने त्याचे पॅन्टच्या कमरेला लपवुन ठेवलेले एक काही तरी मोठे धारधार हत्यार काढले व वाल्मीक यांच्या मानेला लावला. तसेच शिवीगाळ करून धमकी दिली.
वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक यांच्या खिशातून ३ हजार रुपयांची रोकड काढून हिसकावून घेतले. त्यानंतर वाल्मीक बि-हाडे यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक सपकाळे (कोळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबीने तपास करून अहोरात्र मेहनत घेऊन तिघांना अटक केली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड.कॉन्स्टेबल राजेश मेढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भरत पाटील आदींनी केले आहे. तिघांना असोदा शिवारातून ताब्यात घेण्यात आले आहे.