जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जलगाव शहरात बखळ प्लॉट नावावर करून देतो असे सांगून मुक्ताईनगर येथील एका तरुणाची १८ लाखात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी दिनांक १२ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव रवींद्र पवार (वय-४०, रा. कोजागिरी बंगलो, मुक्ताईनगर, जळगाव) हा तरुण खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान त्यांची चंद्रकांत सतीश तोषणीवाल रा. आदर्श नगर, जळगाव याच्याशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून चंद्रकांत तोषणीवाल याने गौरव पवार यांच्याकडून वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले.
दरम्यान चंद्रकांत तोष्णीवाल यांनी प्लॉट गौरवच्या नावावर केलेला नाही. दरम्यान फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पवनने पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी चंद्रकांत तोष्णीवल यांनी पैसे दिले नाही, दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव पवार यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवार १२ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.