नवी दिल्ली; – उत्तर प्रदेशातील हरदोई येथे भीषण रस्ता अपघात झाला असून उन्नाव, मल्लावन येथे वाळूने भरलेला ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवर उलटला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. याशिवाय एक मुलगीही या अपघातात जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण कुटुंब झोपडीत झोपले होते. दरम्यान, ट्रक झोपडीजवळ येऊन पलटी झाला. मृतांमध्ये पती-पत्नी, चार मुले आणि एका नातेवाईकाचा समावेश आहे. मल्लवान शहरातील उन्नाव रस्त्यावर जकात नाका क्रमांक दोनजवळ हा अपघात झाला. काल मंगळवारी रात्री हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला झोपड्या आहेत. वाळूने भरलेला ट्रक कानपूरहून हरदोईच्या दिशेने जात होता. ट्रक ज्या झोपडीत पलटी झाला . त्या झोपडीत अवधेश उर्फ बल्ला यांचे कुटुंब राहते.अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले. घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आला. झोपडीवर पडलेली वाळू जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली.