नवी दिल्ली (प्रतिनिधी ) ;- बी टाऊनमध्ये ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. २३ जून रोजी दोघंही लग्न करणार असल्याचे वृत्त आहे .
विशेष म्हणजे यावर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया धक्कादायक होती. आजकालची मुलं पालकांची परवानगी घेत नाहीत असं ते म्हणाले. आता मिळालेल्या रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि जहीर 23 जून रोजी रजिस्टर मॅरेज करणार आहेत आणि नंतर रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत.
झूमच्या रिपोर्टनुसार सोनाक्षीच्या एका मैत्रिणीने लग्नाच्या चर्चा कन्फर्म केल्या आहेत. २३ जूनला आपल्याला लग्नाचं आमंत्रण मिळालं असल्याचंही ती म्हणाली. पण हे लग्न ग्रँड नसून केवळ रजिस्टर पद्धतीने होणार आहे. नंतर एक पार्टी कपलकडून ठेवण्यात आली आहे.
न्यूज 18 शोशाच्या रिपोर्टनुसार, वेडिंग पार्टीला कुटुंबियांव्यतिरिक्त सोनाक्षी आणि जहीरचे जवळचे मित्र असणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी, आयुष शर्मा यांना आमंत्रण आहे. तसंच सोनाक्षीचे ‘हीरामंडी’तील सहकलाकारही असणार आहेत. ताना शाह, आदिती राव हैदरी, फरदीन खान, शर्मिन सेगल आणि इतरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मुंबईतील ‘बॅस्टियन’ हॉटेलमध्ये सेलिब्रेशन पार्टी असणार आहे.
सोनाक्षी आणि जहीर दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०२२ साली त्यांनी ‘डबल XL’ सिनेमात काम केलं होतं