रामानंदनगर पोलीस स्टेशनला नोंद
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मू. जे. महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीची बेपत्ता झाल्याची तक्रार रामानंद नगर पोलीस स्टेशनला शुक्रवारी दि. ३१ मे रोजी दाखल झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सदरहू तरुणी हिने नाशिक येथे विवाह केला असून दोन ते तीन दिवसात पोलीस स्टेशनला जबाबासाठी येणार असल्याची माहिती तपासाधिकाऱ्यानी दिली.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी हि शहरातील मू. जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी दि. ३१ रोजी दुपारी १ वाजता हि तरुणी महाविद्यालयातून बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पित्याने दिली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहे. दरम्यान, तपासाधिकारी सुनील पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, सदर तरुणीशी संपर्क झालेला आहे. तिने नाशिक येथे विवाह केल्याची माहिती दिली असून पुढील २ ते ३ दिवसात ती रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे जबाबाला येणार असल्याबाबत तपासाधिकाऱ्यानी सांगितले.