राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांची माहिती
रावेर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या सर्वागीण विकासासाठी भावी काळात केंद्र सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मनोदय तालुक्यातील पाल येथे प्रचार करताना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील याची दिले. उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांना रावेर तालुक्यातून आदिवासी पट्ट्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रावेर लोकसभा मतदार संघातील आदिवासी पट्ट्यात रस्त्यांचे जाळे आधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू तसेच आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या असलेल्या योजना प्रभावीपणे राबवू, असे श्रीराम पाटील यांनी सांगितले. आमदार शिरीष चौधरी यांनी पूर्ण दिवसभर तळपत्या उन्हाची पर्वा न करता या प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, दारा मोहम्मद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, राजीव सवर्णे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, मोरव्हालचे उस्मान तडवी, सरफराज तडवी, हनिफा तडवी, पाल येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हमीद तडवी, कामील तडवी, रौनक तडवी, संजय पवार, गणेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.