‘मासू’ संघटनेने दिले निवेदन ; ठिय्या आंदोलनाचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) – विद्यापीठांमध्ये शिकत असणाऱ्या धारशीरी,वंजारे खपाट येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची बस ही महामंडळामार्फत बंद करण्यात आली. सध्या परीक्षेचे वातावरण असून विद्यार्थ्यांवर हे मोठे संकट हे महामंडळाकडून देण्यात आले आहे. याविषयी विद्यार्थी आपले म्हणणे मांडण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांकडून असमाधानकारक उत्तरे देण्यात आली. बस बंद करण्याचा वरूनच जीआर आलेला आहे. तुम्हाला जे करायचे ते करा. बस चालू होणार नाही, अशा शब्दात विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याबाबत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या समस्या एस. टी. महामंडळाच्या प्रशासनासमोर मांडल्या असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बस आम्ही चालू करू. विद्यार्थ्यांबाबत आमची सकारात्मक भूमिका नेहमी असते असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा समज देण्यात येईल असे सुद्धा यावेळी आश्वासन देण्यात आले. बस उपलब्ध न झाल्यास पुढील दोन दिवसात महामंडळामध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल व याला जबाबदार महामंडळ राहील याची दक्षता घ्यावी असे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे व विद्यार्थी हजर होते.