डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज
जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविदयालयाच्या प्राचार्या. निलिमा वारके यांनी मनोगत व्यक्त करताना ज्योतिबा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे महात्मा फुले यांची जयंती आपण आज साजरी करत आहोत, पुण्यातील भिडे वाड्यात मुलीसाठी शाळा सुरु करून स्त्रियांना शिक्षणाचीव्दारे खुली केली महात्मा फुलेनी समाज सुधारणेसाठी किती महत्त्वाचे कार्य केले याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.योगिता घोंगडे यांनी केले तर आभार प्रा.लीना पाटील यांनी मानले.
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्योतिबा फुले यानी जीवनभर समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण यास प्राधान्य देत मानवी जीवनाचा पाया सत्यावर आधारित असावा यासाठी फुले यांनी आपले आयुष्य वेचले े याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.चारुशीला चौधरी यांनी केले तर आभार प्रा.लीना पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.