भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोहर्डी शिवारातील शेतात ईलेक्ट्रीक मोटारीचा धक्का लागल्याने २८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल हरसिंग आकाडे (वय २८ रा. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. बोहार्डी शिवार, ता. भुसावळ) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. सुनिल आकाडे हा कुटुंबासह भुसावळ तालुक्यातील बेहार्डी शिवारातील शेतात वास्तव्याला होता. शेतातील कामे करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता तो विहीरीत पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
जखमी अवस्थेत त्याला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे हे करीत आहे.