पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली येथे पाचोरा पोलिसांच्या पथकाने पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली आहे.

या पथकात पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो. काॅ. विश्वास देशमुख, पो. काॅ. योगेश अरुण पाटील, पो. काॅ. योगेश सुरेश पाटील, होमगार्ड किशोर जगताप, कपिल पाटील, कल्पना निंबाळकर, सोनाली पाटील या पथकाने सदरची कारवाई करत ३१ हजार १०० रुपयांचा अवैधरित्या सुरु असलेल्या दोन गावठी दारु हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सदरची कारवाई २२ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
मल्हारी कोळी (वय – ५३, रा. अंतुर्ली ता. भडगाव) याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु पाडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.









