भुसंपादन करणेसाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे धनादेश प्रदान
जळगाव (प्रतिनिधी) :- आरक्षण क्र. २३९ मौजे असोदा शिवारातील १० हेक्टर ४२ आर जागा भुसंपादन करणेकरीता कृषि उत्पन्न बाजार समिती, जळगांव यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे ९६ लाख ५० हजारांचा धनादेश शुक्रवारी १ मार्च रोजी प्रदान केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामासाठी असोदा येथील जागा भूसंपादित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासनाकडे रक्कम देणे अपेक्षित होते. त्यानुसार शुक्रवारी ९६ लाख ५० हजार ५१७ रुपये रक्कमेचा धनादेश भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जळगांव यांचेकडे बाजार समितीचे सभापती शामकांत बळीराम सोनवणे यांचेहस्ते सुपर्द करणेत आला. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती डॉ.पाडुरंग पाटील, संचालक डॉ. सुनिल महाजन, मनोज चौधरी, दिलीप पाटील, योगराज सपकाळे, डॉ. अरुण पाटील, रवि देशमुख व सचिव प्रमोद वि.काळे, अशोक कुदळ इ. उपस्थीत होते.