जिल्हापेठ पोलीसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मध्यवर्ती भागातील बहिणाबाई चौधरी उद्यान परिसरात बेकायदेशीररित्या तलवार घेवून दुचाकीने फिरणाऱ्या दोन संशयितांवर शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाने शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अक्षय दिलीप ठाकूर (वय २३ रा. कांचन नगर, जळगाव) आणि भानू लक्ष्मीकांत बोरवा (वय २३ रा. शिरसोली ता.जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पो.कॉ. मिलींद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलिम तडवी हे करीत आहे.