जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील दिनकर नगरातील ६ दिवसांपासून बेपत्ता इसमाचा मृतदेह असोदा रोडवरील एका विहिरीत आढळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयेश प्रकाश विसपुते (वय ४२, रा. दिनकर नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो आई, वडील, २ विवाहित बहिणी यांच्यासह राहत होता. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी जयेश विसपुते बेपत्ता झाला होता. त्याप्रकरणी सोमवारी १२ रोजी बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध जारी होता. शुक्रवारी दुपारी असोदा रोडवरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी ओळख पटवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला.
दरम्यान, कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात येऊन शोक व्यक्त केला. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.