जळगावातील राजीव गांधी नगरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला घातलेला फुलांचा हार बकरीने खाल्ल्याने त्याविषयी संबंधितांना कळविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मी भरत सोनवणे (रा. राजीव गांधी नगर) या महिलेशी वाद होऊन तिला मारहाण करण्यात आली. यात महिलेचे डोके फुटले आहे. ही घटना शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राजीव गांधी नगरात घडली.
शुक्रवारी रात्री काही बकऱ्यांनी फुलांचा हार खाल्ला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आशा नरेंद्र सोनवणे (वय ४०) या बकरी मालकांना सांगण्यासाठी गेल्या. त्यावरून वाद झाला व तीन पुरुष आणि एका महिलेने आशा यांना मारहाण केली. यात त्यांचे डोके फुटले आहे. रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
महिलेचे सासरे राजू सोनवणे यांच्या हातावरदेखील लोखंडी रोडने मारहाण करण्यात आली. यात त्यांना जखम झाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.