• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2024
in Uncategorized
0
सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन

जळगाव(प्रतिनिधी)-भरारी फाउंडेशन जळगाव बहिणाबाई महोत्सव २०२४ भरारी फाउंडेशन आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ याचे नवव्या वर्षाचे आयोजन २५ ते २९ जानेवारी सागर पार्क येथे ठिकाणी करण्यात आले आहे यावर्षीच्या बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून पाच दिवस या महोत्सवाचे आयोजन होत आहे.बचत गटातील महिलांना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी व त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी याकरिता गेल्या आठ वर्षापासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन होत आहे. नवव्या वर्षामध्ये आयोजित होत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात १५० महिला बचत गटानी सहभाग घेतला असून या महोत्सवात महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व अस्सल खान्देशी खाद्य पदार्थांचा खाद्य महोत्सव या बहिणाबाई महोत्सवात आयोजित होत आहे. महिला बचत गटा सोबतच जळगाव जिल्ह्यातील लघु उद्योगानी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व प्रसिद्धी करण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाच्या वतीने विशेष स्टॉल लावण्यात येणार आहे.२२ जानेवारी रोजी संपूर्ण भारतभर राममंदिर स्थापना उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून या वर्षी बहिणाबाई महोत्सवाचे मुख्य आकर्षण आयोध्या येथील स्थापन होत असलेल्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती बहिणाबाई महोत्सवाच्या अग्रस्थानी असणार आहे. खान्देश पर्यटन चित्रप्रदर्शनी बहिणाबाई महोत्सवात २५ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने खान्देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक स्थळांची माहिती देणारे खान्देश पर्यटन चित्र प्रदर्शनी व कलादालन या महोत्सवात असणार आहे.

खान्देशची संस्कृती व लोककलेचा उत्सव हे ब्रीद घेऊन नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या बहिणाबाई महोत्सवातील या वर्षीचा सांस्कृतिक जागर देखील विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले (जालना) यांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे, आपल्या सुंदर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना भुरळ घालणारा सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे (नाशिक) यांचा भावगीत व लोकगीतांचा कार्यक्रम असणार आहे. जळगावच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य दिग्दर्शिका डॉ अपर्णा भट यांचा रामायणावर आधारित सेतू बांधा रे हि नृत्य व संगित नाटिका तसेच खान्देशा सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला प्रवीण माळी यांचा अहिराणी एकपात्री कार्यक्रम आयत पोयत संख्यान व प्रजासत्ताक दिनी एक शाम देश के नाम हा मराठी हिंदी देशभक्ती गीतांचा विशेष कार्यक्रम या वर्षीच्या महोत्सवात आयोजित करण्यात आलेला आहे.
फाउंडेशन आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ याचे नवव्या वर्षाचे आयोजन २५ ते २९ जानेवारी बॅ. निकम, सागर पार्क, जळगांव या ठिकाणी करण्यात आले आहे. यावर्षीच्या बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून पाच दिवस महोत्सवाचे आयोजन होत आहे. दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, देशसेवा, कला, साहित्य, लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवातील नवव्या वर्षाचे बहिणाबाई पुरस्कार २०२४ आज जाहीर करण्यात येत आहे. या वर्षीच्या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक उद्योग, वैद्यकीय, कला साहित्य लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८ व्यक्तींना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. बहिणाबाई पुरस्कार २०२४ यावर्षी सुनील भोकरे चाळीसगाव जि.जळगाव (देशसेवा), डॉ गणेश चंदनशिवे मुंबई (लोककला), डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे जळगाव (वैद्यकीय), डॉ. प्रीती अग्रवाल जळगाव (शैक्षणिक), मनीषा घोलप नाशिक(महिला सक्षमीकरण), अर्चना जाधव जळगाव (उद्योग व कौशल्य विकास), अनिल कोष्टी भुसावळ जि. जळगाव(नाट्य), नामदेव कोळी जळगाव (साहित्य), यांना या वर्षीचा मानाचा बहिणाबाई पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात येणार आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/sagar-park-yethe-bahinabai/
Previous Post

पाचोरा कर्मचारी सकाळपासून लागले स्वच्छतेच्या कामाला

Next Post

VR, IOT, रोबोटिक्स सारखे क्षेत्रात योग्य ज्ञान घेतल्यास करिअर मध्ये उंच भरारी घेता येईल- संजयजी वाघ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
VR, IOT, रोबोटिक्स सारखे क्षेत्रात योग्य ज्ञान घेतल्यास करिअर मध्ये उंच भरारी घेता येईल- संजयजी वाघ

VR, IOT, रोबोटिक्स सारखे क्षेत्रात योग्य ज्ञान घेतल्यास करिअर मध्ये उंच भरारी घेता येईल- संजयजी वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon