जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शनिपेठकडे गिरणा नदीपात्रातून वाळू घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरने दूरध्वनीच्या खांबाला धडक दिल्याने खांब कोसळून ट्रॅक्टरही उलटले. चालक किरकोळ जखमी झाला आहे. घटना सोमवारी १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता चौगुले प्लॉट भागात घडली.
सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता लाल रंगाचे एक ट्रॅक्टर ममुराबाद रस्त्याकडून येत असताना चौगुले प्लॉट कॉर्नरवर मोतीलाल चौधरी यांच्या घराजवळ असलेल्या एका दूरध्वनीच्या खांबाला धडकले. त्यामुळे हा खांब कोसळला व ट्रॅक्टरही उलटले. त्यामुळे त्यातील वाळू रस्त्यावर व गटारीत पसरली. काही वेळाने डंपर मागवून त्यात वाळू भरून नेण्यात आली. याप्रकरणी पोलीस घटनेची माहिती घेत होते.