मेहरूण शिवारात एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- दोन संशयित तरुण धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मेहरूण शिवारात धाव घेतली. तेथे एकाला अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाला आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रईस शेख रशिद (वय ३२, रा.तांबापुरा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार शोएब शेख सलीम (रा. जुम्मा शाहा वखारजवळ मेहरुण) हा पसार झाला आहे. रईस शेख तसेच शोएब शेख असे दोघे चॉपर घेवून सोमवारी रात्री साडेआठ वाजता तांबापुरा परिसरात जळगावजवळील खदानजवळ चॉपरसह फिरत होते. पोलिसांनी तपासणी केली असता रईस याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याजवळ चॉपर आढळून आले. तर त्याचा साथीदार शोएब हा चॉपरसह पसार झाला. याप्रकरणी पोकॉ ललीत नारखेडे यांच्या तक्रारीवरुन दोघा संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सफौ अतुल वंजारी करत आहेत.