• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती

दीड लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेचा अंनिसकडून पुण्यात पर्दाफाश  

पुणे (प्रतिनिधी) :- शहरातील पाषाण येथे कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादुटोणा करत दीड लाखांची फसवणूक करणाऱ्या वृषाली ढोले-शिरसाठ या महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, चतु:श्रृंगी पोलिस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला आहे. दरम्यान, ढोले-शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता हातात गंडा बांधून राख खाण्यास दिल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी वृषाली संतोष ढोले (रा. साई चौक, पाषाण), माया राहुल गजभिये (रा. विठ्ठलनगर, सुतारवाडी रोड, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (रा. पाटीलनगर, बावधन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२१ ते १६ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीत  मुक्ता रेसिडेन्सी, सुतारवाडी, पाषाण येथे घडला आहे. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायदा कलम ३(२) सह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव आणि पोलिस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.

नैराश्यग्रस्तांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी व यश मिळवण्यासाठी समुपदेशन केले जाईल, अशी जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून करत लोकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे तरुणाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याला नैराश्य आले. सोशल मीडियावर त्याला या समुपदेशनाबाबत समजले. फिर्यादी वृषाली ढोले यांच्याकडे गेला असता, स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी तरुणाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. त्यानंतर पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. तसेच, स्वत:च्या अंगी अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. असे करत संबंधित युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये उकळले आहेत.

तरुणाने यासंबंधीची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांच्याकडे करत, सदर महिला आणि तिचे साथीदार हे जादुटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याचे सांगितले. यानंतर अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६)  विशाल विमल हे पीडित युवक व साध्या वेशातील पोलिसांसोबत सदर महिलेच्या कार्यालयात उपचारासाठी गेले.

रिसेप्शनवर माया गजभिये आणि सतीश वर्मा हे बसले होते. विशाल यांना कन्सल्टिंग फी १ हजार रुपये भरण्यास लावून, त्यांना आतमधील रूममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले-शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. संबंधित महिला ही अघोरी, अनिष्ठ, जादुटोण्याचा प्रकार करून लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांना आतमध्ये बोलवले. पोलिसांनी आतमध्ये येत पंचनामा करुन जादुटोण्याच्या वस्तू जप्त केल्या.


 

Tags: #jalgaon #maharatra anis news#pune anis news#pune crime #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aangat-atindriy-shakti-bhasvun/
Previous Post

सरपंच, ग्रामसेवकांसह कर्मचाऱ्यांचे उद्यापासून ‘काम बंद’ आंदोलन

Next Post

हिवाळ्यात कसा असावा आहार विहार ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हिवाळ्यात कसा असावा आहार विहार ?

हिवाळ्यात कसा असावा आहार विहार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon